अकोल्यातील खदान पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय सायरे (सेवानिवृत्त) व एपीआय निलेश करंदीकर ह्यांनी अकोल्यातील हॉटेल महाकालीच्या संचालकाच्या मुलावर खोटे गुन्हे दाखल करून अवैधरित्या त्याचा मोबाईल ठेवून घेतला होता. त्याबद्दल उच्च न्यायालयात खोटे शपथपत्र दाखल केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींच्या आदेशाने धनंजय सायरे यांची सेवानिवृत्ती नंतर विभागीय चौकशी करून अकोल्याचे तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी तसा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाला पाठविला होता. त्या चौकशीच्या अंती देखील सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक धनंजय सायरे ह्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून १,५००/- रुपये दरमहा कपात करण्याचे आदेश पोलिस ह्यापूर्वीच महासंचालकांनी जारी केले आहेत.
सेवानिवृत्त (एक टप्पा पदोन्नती प्राप्त) पो.उप.अधिक्षक (मुळ पद पो. नि.) धनंजय महादेव सायरे तत्कालीन ठाणेदार पो.स्टे.खदान, अकोला, जिल्हा अकोला ह.मु.धामणगांव रेल्वे,जिल्हा अमरावती यांचे विरुध्द सादर करण्यात आलेल्या विभागीय चौकशी अहवालात त्यांना नोकरीच्या काळात मिळालेली बक्षिसे व त्यांना झालेल्या शिक्षेबाबत तत्कालीन पोलिस महासंचालक यांना अहवाल सादर करण्यात आला होता,त्यामध्ये पुढीलप्रमाणे माहिती सादर करण्यात आली होती.
१) नेमणूक: (भरती) दि.०३/०८/१९८९ पोलीस शिपाई,अमरावती ग्रामीण.
२) सेवानिवृत्ती दि.३०/११/२०२४
३) त्यांना प्राप्त बक्षीसे - ८४
४) त्यांना झालेल्या शिक्षा:-
१) सक्त ताकीद -१.
२) १०००/-रु.दंड -१.
३) दोन वर्ष वेतनवाढ स्थगिती -१.
४) दि.२३.०१.२००८ ते दि.३१.०५.२००८ पर्यंतचा निलंबन काळ जसाचा तसा.
५) दि.३१.०१.२०१५ ते दि. २७.०७.१५ पर्यंत निलंबित, निलंबन काळ अनिर्णित.
६) दि.२२.०१.२०२९ ते दि.०१.०३.१९ पर्यंत निलंबित, निलंबन काळ अनिर्णित.
७) दि.१८.०५.२०२४ ते दि.१८.११.२४ पर्यंत निलंबित, निलंबन काळ अनिर्णित.
५) सेवा कालावधी :- ३५ वर्ष ०३ महीने २७ दिवस.
धनंजय महादेव सायरे, तत्कालीन पोलिस निरीक्षक,पो.स्टे.खदान, जिल्हा अकोला ह.मु. धामनगांव रेल्वे,जि.अमरावती
याच्याविरुद्धच्या विभागीय चौकशीचा अहवालाचा पोलिस महासंचालक कार्यालयाने काढलेला निष्कर्ष व बजावण्यात आलेले आदेश पुढीलप्रमाणे आहेत.
१) एकंदरीत विभागीय चौकशीमध्ये तत्कालीन पोनि, धनंजय सायरे पो. स्टे. खदान येथे कर्तव्यावर असतांना पो. स्टॉफसह शासकीय वाहनाने दि. ०४.०३.२०२४ रोजी १९.३० वा. पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मिळालेल्या माहिती वरून त्यांच्याच मार्गदर्शनात सपोनि.निलेश करंदीकर यांनी पो.स्टॉफसह अकोला शहरातील मूर्तिजापूर मार्गावरील महाकाली चायनीज रेस्टारेंट येथे छापा टाकुन ३ घरगुती वापराचे सिलेंडर व ईतर साहीत्य पंचासमक्ष जप्त करून वैभव महेंद्रसिंग रघुवंशी यांचेवर पो.स्टे.खदान, अकोला येथे गु.र.नं, २१७/२४ कलम ३,७ अत्यावश्यक वस्तु अधिनीयम १९५५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपास अधिकारी सेनि.पोनि.धनंजय सायरे यांनी मा.सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वानुसार कलम ४१ 'अ' जा.फौ.प्रमाणे आरोपी अटके बाबत प्रो.फॉर्म कार्यवाही केल्याचे दिसुन येत नाही.
२) गुन्हयामध्ये सपोनि.निलेश करंदीकर यांनी आरोपी यांची अंगझडती घेवून त्यांचे कडील ओपो कंपनीचा मोबाईल ताब्यात घेवून, पंचासमक्ष जप्त न करता गैरकायदेशीररित्या स्वतःचे ताब्यात ठेवला. सदर माहीती तपास अधिकारी यांना दिली नसली तरी पो.नि. धंनजय सायरे यांनी गुन्हयात जप्त माल व माल पावती याची पडताळणी करून जप्त मालाबाबत खात्री करून केस.डायरी क्र. ०१/२४ ते ०५/२४ मध्ये नोंद घेणे गरजेचे असतांना अभिलेखावर घेतल्याचे दिसुन येत नाही. या गुन्हयामधील आरोपी वैभव रघुवंशी यांनी मोबाईल परत मिळण्याकरीता वि. प्रथम वर्ग,न्यायालय अकोला येथून मोबाईल सुपूर्दनाम्यावर परत मिळण्याबाबत आदेश प्राप्त करून खदान पोलिसांना दिले होते. परंतु वैभव रघुवंशी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचीकेच्या अनुषंगाने स्वताचे म्हणणे शपथपत्रावर सादर करतांना आरोपी यांचा मोबाईल जप्त न केल्याची चुकीची माहीती सेनि.पोनि.धनंजय सायरे यांनी उच्च न्यायालयात सादर केली.
वास्तविक पाहता दि.१०.०७.२४ रोजी वि. कोर्टाच्या आदेशानुसार वैभव रघुवंशी यांना खदान पोलिसांकडून मोबाईल सुपूर्दनाम्यावर ताब्यात देण्यात आला आहे.
३) खदान पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आलेला कथित गुन्हा खारीज करण्यासाठी वैभव रघुवंशीने उच्च न्यायालय खंडपीठ, नागपुर येथे दाखल केलेल्या रीट पीटिशन क्रमांक ३८९/२४ मध्ये त्याचा मोबाईल फोन सुपूर्दनामाच्या आदेशानुसार त्यांचेकडे दिला असल्याचे पोलीस अधिक्षक, अकोला यांनी शपथपत्र दाखल करतांना दि. ०८.१२.२४ रोजी नमुद केले आहे. मात्र से.नि.पोनि. धनंजय सायरे यांनी ह्याच याचिकेच्या अनुषंगाने दि.१८.१२.२४ रोजी स्वतःचे म्हणणे सादर करतांना आरोपीचा मोबाईल कधीही जप्त केला नाही,आरोपी स्वतः ठेवून गेला अशी चुकीची माहिती शपथपत्रावर उच्च न्यायालयास दिली असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचे विभागीय चौकशीत निष्पन्न झाले आहे. यावरून तत्कालीन सेनि.पोनि.धनंजय सायरे, पो.स्टे. खदान, अकोला यांनी गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करतांना पर्यवेक्षणात ढिसाळपणा, हलगर्जीपणा, निष्काळजीपणा करून कर्तव्यात परायनता व पोलीस अधिका-यास अशोभनीय असे बेजबाबदारपणाचे वर्तन करून पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली व दोषारोप प्रमाणे कसुर केला असल्याचे विभागीय चौकशी मध्ये दिसुन आले आहे, त्यांनी त्यांचे कर्तव्यात केलेल्या कसुरी प्रमाणे अनुशासनात्मक कार्यवाहीसाठी अहवाल तत्कालीन अभय डोंगरे,अपर पोलीस अधिक्षक, अकोला तथा धनंजय सायरे यांच्या विभागीय चौकशी प्रकरणातील चौकशी अधिकारी यांच्याकडून राज्याच्या पोलिस महासंचालक यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
त्यानुसार पोलिस महासंचालक कार्यालयाला हा अहवाल प्राप्त झाल्यावर ह्या अहवालावर निष्कर्ष काढण्यात येऊन प्राप्त विभागीय चौकशी अहवालाचे व सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय महादेव सायरे यांनी सादर केलेल्या बचावाच्या निवेदनाचे अवलोकन करण्यात येऊन सेवानिवृत्त पोलीस निरक्षक धनंजय महादेव सायरे हे खदान पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असतांना अप. क्र.२१७/२०२४ कलम ३.७ अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ च्या गुन्हयातील केलेल्या कसुरीच्या अनुषंगाने त्यांचेवर दोषारोप ठेवण्यात येऊन, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ मधील नियम २७ (१) मधील तरतुदींनुसार तसेच, शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे-१००१/१३०/सेवा-४, दिनांक ०२/०६/२००३ मधील तरतुदींनुसार
राज्याच्या तत्कालीन पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एका आदेशाद्वारे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय महादेव सायरे यांना या कार्यालयाने दि.१०/०७/२०२५ च्या ज्ञापनामध्ये प्रस्तावित केलेल्या" त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून दरमहा रु.२,०००/- (रुपये दोन हजार) दोन (०२) वर्षासाठी का कपात करण्यात येवू नये?" या शिक्षेमध्ये अंशतः बदल करून त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून दरमहा रु.१,५००/- (रुपये एक हजार पाचशे) दोन (०२) वर्षासाठी कपात करणे" ही शिक्षा दिली आहे.दिनांक २७/११/२०२५ रोजी बजावण्यात आलेल्या ह्या आदेशाच्या प्रति
पोलीस अधीक्षक, अकोला, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय महादेव सायरे,
यांना त्यांची अखेरची अर्थात अडीच दिवसांची पोलिस उपअधीक्षक म्हणून तत्कालीन नेमणूक असलेल्या
पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर ह्यांच्यामार्फत सदरहू आदेश बजावण्यात आले होते.
ह्याच प्रकरणांत कालच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना फोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे,एकाच प्रकरणांत दोन दोन शिक्षा भोगणारे धनंजय सायरे हे बहुदा संपूर्ण राज्यातील पहिलेच अधिकारी असावेत असा अंदाज वर्तविण्यात आहे.
अशाच प्रकारची कारवाई पोलीस निरी.धनंजय सायरे हे वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे कार्यरत असताना देखील त्यांनी देवळी येथील प्रतिष्ठित नागरिक असलेल्या दोघा बापलेकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना पोलिस ठाण्यात काही एक कारण नसताना अडकवून ठेवले होते.त्या प्रकरणांत त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन लाख रुपये दंडाची शिक्षा त्यावेळी सुनावली होती.सोबतच त्यावेळी २० हजार रुपये कोर्ट खर्चाची रक्कम तक्रारकर्त्याला देण्याचे आदेश करण्यात आले होते.
यावरूनच सायरे यांची कारकिर्द किती वादग्रस्त होती याची सहज कल्पना येते.




0 टिप्पण्या