महाराष्ट्र पोलिस दलातील "पाठीचा कणा "असलेल्या महत्त्वपूर्ण अशा पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा मेमो आज जारी करण्यात आला आहे. १६९ पोलिस निरीक्षकांच्या विहित कालावधी पूर्ण झाल्याने नियमित, तर ९८ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत.
जवळपास आता पोलिस दलातील सर्वच स्तरातील बदल्यांची मोहीम पूर्ण झाली असून फक्त सन २०२५/२६ च्या पोलिस निरीक्षकांना उप अधीक्षक पदावर पदोन्नती देण्याची यादी जाहीर व्हायची तेव्हढी बाकी आहे. ह्या पदोन्नती देण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत त्यांना पाहिजे असलेल्या संवर्गाची मागणी झालेली नसल्याने ह्या पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांना पदस्थापना देणे आज तरी शक्य नसल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात ही यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.











0 टिप्पण्या